नमस्कार,
आपली विद्या विकास एज्युकेशन सोसायटी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वांगणी,
आपली शाळा ही केवळ शैक्षणिक ज्ञान देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे.
आमच्या शाळेच्या सह संचालिका श्रीम. माधवी नांदोसकर नेहमी सांगतात की, "
शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, मूल्ये आणि कौशल्यांचा विकास घडवणारे असावे".
आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शना मुळे,
आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, हस्तकला, कथाकथन, वक्तृत्व,नाट्य, भाषण सादरीकरण आणि विविध उपक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि ते आत्मविश्वासाने आपले विचार मांडू शकतात.
तसेच, सामाजिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी समूह कार्य, विविध शालेय उपक्रम, सण-उत्सव साजरे करणे आणि सामुदायिक कार्यक्रम यांचा समावेश केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, नेतृत्व आणि परस्पर आदर यांची जाणीव निर्माण होते.
विद्यार्थ्यांचा भावनिक विकास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी ध्यान (माइंडफुलनेस) , मूल्य शिक्षण आणि संवाद सत्रांद्वारे ( इंग्रजी व मराठी भाषेतून मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात येते ) विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना समजून घेण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत केली जाते.
आपली शाळा पर्यावरण जागरूकतेला विशेष महत्त्व देते.शाळेचे संस्थापक स्वर्गीय प. म. राऊत सर यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाबरोबर, भावनिक, व सामाजिक जबाबदारी बाबतची दूरदृष्टी याच्या यातूनच त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभ दिनी आपल्या शाळेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या उपक्रमाचे आयोजन केले जाते या माध्यमातून शाळेत व वांगणी गावात यानिमित्ताने वृक्ष लागवड केली जाते , स्वच्छता अभियान आणि पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व आणि जबाबदारीची जाणीव करून दिली जाते.
कला आणि संगीताचा दृष्टिकोन व तसेच चिकित्सक विचार सरणी ठेवणाऱ्या आमच्या शाळेच्या सी.ई.ओ स्वर्गीय सौ.विद्या राऊत मॅडम यांच्या प्रेरणेतून साकार झालेला हुन्नर आज विद्यार्थ्यांना उच्च शिखरापर्यंत नेण्यास प्रेरित करत आहेत आपले विद्यार्थी संगीत क्षेत्रामध्ये सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून आपला विद्यार्थी चिरंजीव भावेश खाडे वांगणी गावातून ओळखला जाऊ लागला नृत्य व अभिनय यामध्ये आमची विद्यार्थिनी कुमारी यज्ञा सावंत ही ढोलकीच्या तालावर या माध्यमातून प्रसिद्धीला आली अभिव्यक्तीला दिशा देतात.
आजच्या युगात तांत्रिक कौशल्ये अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे स्मार्ट क्लासरूम, संगणक शिक्षण आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडले जाते आणि त्यांना भविष्यासाठी तयार केले जाते.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडतो आणि ते आत्मविश्वासपूर्ण, जबाबदार आणि सक्षम नागरिक बनतात.
विद्यार्थ्यांच्या भावना, कल्पनाशक्ती, व संपूर्ण व्यतिमत्व घडवण्यास .. संस्था सर्व परीने प्रयत्न करते शिक्षकांसाठी चर्चासत्रे व सेमिनार अद्यावत असे प्रशिक्षण या माध्यमातून शिक्षक सक्षम होण्यास मदत होते.
या सर्व यशामागे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
संस्थेचे चिटणीस मान. डॉ. विनय राऊत डेप्युटी सी. ई.ओ मान.डॉक्टर मॅडम यांच्या मोलाच्या सूचना, प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात.
शिक्षकांची मेहनत, पालकांचा विश्वास आणि व्यवस्थापन समितीचे सहकार्य यामुळे आपण एक सकारात्मक आणि प्रगत शैक्षणिक वातावरण निर्माण करत आहोत.
धन्यवाद!
-मुख्याध्यापिका
श्रीमती अंजली चव्हाण