आमची संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक व नैतिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. इयत्ता ५ वी ते १० वी तसेच कनिष्ठ महाविद्यालय विभागामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाद्वारे आधुनिक शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शन, अभिनव गृहपाठ योजना, अभ्यासशिबिरे, अतिरिक्त तासिका, प्रश्नपत्रिका संच सराव तसेच संगणक व प्रोजेक्टरच्या सहाय्याने अध्यापन केले जाते.
संस्थेमध्ये शैक्षणिक प्रगतीसोबत संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध सहशालेय, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रशिक्षित, अनुभवी व विद्यार्थीहित जपणारा शिक्षकवर्ग ही संस्थेची मोठी ताकद आहे.