स्वामी शामानंद नाईट हायस्कूलची स्थापना सन १९९२ मध्ये तसेच ज्युनियर कॉलेजची स्थापना सन २००० मध्ये संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी श्री. प. म. राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली भटवाडी, घाटकोपर (पश्चिम) येथे करण्यात आली. परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कामगार वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
रात्रशाळेमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दिवसा विविध ठिकाणी काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत जीवनात प्रगतीची संधी मिळावी यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. प्रशिक्षित, अनुभवी व विद्यार्थीहित जपणारा शिक्षकवर्ग, आधुनिक अध्यापन पद्धती, ई-लर्निंग सुविधा तसेच संगणक व ग्रंथालय विभाग यांमुळे संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाते.